आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा खरिपात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे तसेच तुरीचे नुकसान झाले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात हरभरा मोठ्या प्रमाणात पेरला आहे. दरम्यान खरिपात झालेल्या अतिवृष्टीमधून जी काही तूर वाचली होती, ती तूर आता निघाली आहे. तसेच हरभरा सुद्धा निघण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन तूर व हरभरा विक्रीसाठी आला असून, तुरीला प्रतिक्विंटल ६ ते ७ हजार ३०० आणि हरभऱ्यास प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ४०० रुपयांदरम्यान भाव मिळत आहे. अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर आणि कपाशीला फटका बसला होता.
त्यामध्ये तुरीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात सुमारे ३५ टक्क्यांहून अधिक घट आली आहे. मात्र त्यामधून वाचलेली तूर आता निघायला सुरूवात झाली आहे. मागील आठ दिवसांपासून बाजारात नवीन तूर विक्रीसाठी शेतकरी घेऊन येत आहेत. सद्य:स्थितीत दरदिवशी १ हजार ५०० ते २ हजार पोते तुरीची आवक सुरू आहे. नवीन हरभरा अल्प प्रमाणात विक्रीला येत आहेत.
बुधवारी (दि. १)येथील बाजारात हरभऱ्यास प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल तर तुरीला ६ ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला आहे. तुरीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असले तरी बाजारात भाव मात्र मागील वर्षी होता, तोच मिळत आहे. सध्या हरभऱ्यालासुद्धा मागील वर्षी असलेले दरच मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी बाजारात कृषी मालाला वाढीव भाव नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजार समितीमधील छायाचित्र.
सोयाबीनचा दरसुद्धा पाच ते साडेपाच हजार रुपयांवरच याचवेळी सोयाबीनचा दरसुद्धा यावर्षी सुरूवातीपासून पाच ते सहा हजारांच्या आसपास होता. समोर भाव वाढणार या आशेने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करणे थांबवले आहे मात्र अजूनही सोयाबीनच्या भावात वाढ झाली नसून उलट दोन महिन्यांपूर्वीच्या तुलनेत सोयाबीनचा दर कमी झाला आहे. मंगळवारी बाजारात सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ९५० ते ५ हजार ३५० रुपये दर मिळाला आहे. तसेच कापसाच्या दरात सुद्धा वाढ झाली नसून, मागील महिनाभरापासून कापूस प्रतिक्विंटल ८ हजार १०० ते ८ हजार ३०० रुपयांवरच थंाबले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.