आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्ह्यातील 2 हजार 662 रुग्णांना नवी दृष्टी ; नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सामान्य रुग्णालयातील (इर्विन) नेत्र विभागाने दोन नि:शुल्क नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील २ हजार ६६२ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. शस्त्रक्रियेमुळे या रुग्णांना नवी दृष्टी मिळाली आहे.

केंद्र शासनपुरस्कृत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत स्वयंसेवी संस्था व खासगी व्यावसायिकांना सहभागी करून घेत नेत्रसेवा कार्यक्रमांबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने जिल्हा सामान्य रुग्णालयात ३० खाटांचा नेत्र विभाग कार्यरत आहे.

या विभागात सात महिन्यांत १ हजार ४०५ महिला व एक हजार २५७ पुरुष अशा एकूण दोन हजार ६६२ सप्टेंबर रुग्णांवर विनाटाक्याची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच नेत्र विभागात सात महिन्यांच्या कालावधीत दोन निःशुल्क नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रियाही केल्या आहेत. या दोन्ही शस्त्रक्रिया मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या आहेत. पहिली शस्त्रक्रिया ही एप्रिल महिन्यात लवादा येथील ३५ वर्षीय महिलेची, तर ऑक्टोबर महिन्यात बिहाली येथील एका ३० वर्षीय पुरुषाची नेत्रप्रत्यारोपण करून त्यांना दृष्टी देण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. यामध्ये एप्रिल महिन्यात ४७६ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. तसेच मे महिन्यात ३०१ रुग्णांवर, जूनमध्ये ३६५, तसेच जुलै ४०२ तर ऑगस्ट महिन्यात २६५ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांमध्ये ८५३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत २ हजार ६६२ रुग्णांना नवी दृष्टी मिळाली आहे. नवी दृष्टी मिळालेल्या गोरगरीब गरजू रुग्णांनी जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांचे आभार मानले आहेत.

दोन रुग्णांवर मोफत नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात सात महिन्यांत रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या. जिल्ह्यातील गरीब ,गरजू रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रिया करतात. दोन रुग्णाच्या मोफत नेत्रप्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्या. -डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...