आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाचा तपास:एनआयएचे पथक पुन्हा शहरात दाखल

अमरावती15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या खुनाचा तपास एनआयएकडून सुरू आहे. या प्रकरणात सात आरोपींना पुर्वीच अटक झाली आहे. मात्र अजूनही एक आरोपी पसार आहे. त्याचा शोध घेणे तसेच तपासाच्या अनुषंगाने एनआयए अधिकाऱ्यांचे एक पथक सध्या शहरात दाखल झाले आहे. या पथकाने मंगळवारी (दि. २) गुन्ह्यासंदर्भात तपास केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत पोलिस किंवा एनआयएकडून अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

२१ जून २०२२ ला उमेश काेल्हे यांचा खून झाला होता. त्यानंतर शहर पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. दरम्यान कोल्हे यांनी नूपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळेच त्यांचा खून झाल्याचे समोर आले होते. त्यामुळेच प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला. त्यानंतर एनआयएने सातही आरोपी ताब्यात घेवून त्यांना ४ जुलै २०२२ ला मुंबईत नेले. दरम्यान, सध्या सातही आरोपींची मुंबईच्या कारागृहात रवानगी झाली आहे. मात्र, प्रकरणात सहभागी एका आरोपीला अद्याप अटक झाली नाही. त्याचा शोध एनआयए घेत आहे. अटकेतील आरोपींकडून समोर आलेल्या माहितीच्या आधारे तपासाशी संबधित आणखी काही माहीती घेण्यासाठी एनआयएचे पथक सध्या शहरात आल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...