आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:शिक्षक बँकेच्या निवडणुकीत कुणाचाही अर्ज बाद नाही ; 194  उमेदवार; 20 जूनपर्यंत माघारीची मुदत

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेच्या २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी उमेदवारी दाखल केलेल्यांपैकी कुणाचाही अर्ज बाद ठरविला गेला नाही. छाननीअंती सर्व १९४ अर्ज वैध ठरले. त्यामुळे आजच्या घडीला या निवडणुकीत १९४ उमेदवार मैदानात आहेत. दरम्यान माघारीची प्रक्रिया आजपासूनच सुरु झाली असून, ती आगामी २० जूनपर्यंत चालणार आहे. परिणामी निवडणुकीच्या मैदानातील उमेदवारांची खरी संख्या त्या दिवशी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक राजेश लव्हेकर यांना निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे माहितीनुसार, शिक्षक बँकेंच्या २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी २ जुलैला निवडणूक होत असून, ३ जुलै रोजी मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाणार आहे. सदर निवडणुकीसाठी गेल्या २७ मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरु झाले होते. दरम्यान, उमेदवारी मागे घेण्यासाठी ६ ते २० जून हा कालावधी राखून ठेवण्यात आला असून, २१ जूनला निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतीम यादी घोषित केली जाणार आहे. तर त्याच दिवशी दुपारी संबंधितांना चिन्हवाटप ही केले जाईल, असे निवडणूक यंत्रणेच्या वेळापत्रकात नमूद आहे.

अशी आहे संचालक मंडळाची रचना सर्वसाधारण गट १५ पोटनियम १०(२) नुसार ०१ एससी-एसटी ०१ ओबीसी ०१ व्हीजे-एनटी ०१ महिला प्रतिनिधी ०२ एकूण २१

बातम्या आणखी आहेत...