आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सायलेन्स झोन’ कागदावरच:शहरात ध्वनिप्रदूषणाने ओलांडली सीमा; ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज; बालकांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात ध्वनिप्रदूषणाने सीमा ओलांडली असतानाही सायलेन्स झोनमध्ये शांतता पाळण्याची अंमलबजावणी शून्य आहे. सायलेन्स झोन केवळ कागदावर अन् नावापुरतेच आहेत. न्यायालय, रुग्णालय, शाळा -महाविद्यालये, बाजारपेठ, मुख्य चौक, ज्येष्ठ नागरिक राहत असलेल्या भागात जाऊन ‘दिव्य मराठी’ने ध्वनीच्या तीव्रतेची मोजणी केली असता ध्वनी प्रदूषणाने मर्यादा ओलांडल्याचे निदर्शनास आले आहे.

कोणत्या क्षेत्रात किती ध्वनी मर्यादा असावी, यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आकडेवारी प्रसिद्ध केली असली तरी तिचे पालन होत नाही. याचा सर्वाधिक त्रास हृदयरुग्ण, दमा, अस्थमा असलेले रुग्ण, लहान बालकं, ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत आहे. डॉक्टरांनी ध्वनिप्रदूषणातील वाढ धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

शहरातील पाच ठिकाणी ध्वनीची तीव्रता मोजल्यानंतर ती मर्यादेपेक्षा जास्त आढळली आहे. शहरात सर्वाधिक ध्वनीची तीव्रता तखतमल व्यापारी बाजारपेठ असलेल्या जयस्तंभ चौकात तर सर्वात कमी तरीही मर्यादेपेक्षा जास्त ध्वनिची तीव्रता जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे आढळली.

शहर पोलिसांकडे २० ध्वनिमापक यंत्रे शहरातील १० पोलिस ठाण्यांमध्ये ध्वनी मोजणारी २० यंत्रे आहेत. मिरवणुकीतील ढोल-ताशे, डीजेचा आवाज जास्त असल्याच्या तक्रारी आल्यास पोलिसांद्वारे प्रत्यक्ष स्थळावर जाऊन आवाज मोजला जातो.

बातम्या आणखी आहेत...