आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक प्रचाराचा प्रमुख मुद्दा:50 सक्रिय कार्यकर्ते जोडणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्या : पाटील

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप सरकारच्या काळातील वाढती महागाई सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, हा निवडणुकीत प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनवा, त्यासमाेर धार्मिक तेढ करणारे सर्व मुद्दे फिके पडतील. आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी पक्षसंघटना मजबूत करण्याकरिता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आताच कामाला लागा, तसेच किमान ५० सक्रिय कार्यकर्ते जोडणाऱ्यालाच राष्ट्रवादीची उमेदवारी द्यावी, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

स्थानिक धर्मदाय कॉटन फंडच्या सभागृहात राष्ट्रवादीकडून आयोजित संवाद बैठकीत रविवारी सायंकाळी ते बाेलत हाेते. या वेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते संजय खाेडके, माजी खा. सुबाेध माेहिते, पक्ष निरीक्षक आर्य, जानराव म्हस्के, शहराध्यक्ष प्रशांत डवरे, माजी महापाैर अ‍ॅड. किशाेर शेळके, शरदराव तसरे, प्रा. हेमंत देशमुख, सनाउल्ला खान, डॉ. गणेश खारकर, माजी महापाैर रिना नंदा, जितेंद्र ठाकूर, रतन डेंडुले, महिला शहराध्यक्षा सुचिता वणवे आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते.

संजय खाेडके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची चांगली संघटना अमरावतीत निर्माण झाली आहे. शहराध्यक्ष प्रशांत डवरेंना अमरावती महापालिकेचा चांगला अनुभव आहे. संजय खाेडके यांच्या मार्गदर्शनाचा आणि प्रशांत डवरे यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन येणाऱ्या अमरावती मनपाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद सर्वांना दिसून येईल. त्याकरिता आम्ही सर्व संजय खाेडकेंच्या पाठीशी उभे आहाेत. लाेकांना सदैव संपर्कात राहणारा नेता हवा असताे. संजय खाेडके हे स्वत: स्कुटरवर फिरतात, त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. आगामी निवडणुकीत खाेडकेंच्या या जनसंपर्काचा राष्ट्रवादीला लाभ हाेईल.

येत्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचाच : संजय खोडके
आगामी महापालिकेच्या निवडणुका शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस या चार पक्षात हाेणार आहे. गेल्या निवडणुकीचा अपवाद सोडता, आतापर्यंत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीला साेबत घेतल्याशिवाय कुणालाही सत्ता स्थापन करता आली नाही. आगामी निवडणुकीत महापाैर हा राष्ट्रवादीचाच असेल, असा विश्वास संजय खाेडके यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...