आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथील लाखो रुपयांच्या गुटखा प्रकरणात एलसीबीने विदर्भातील गुटखा तस्कराला ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी केली. विक्रम उर्फ विक्की मंगलानी (रा. अमरावती) असे तस्कराचे नाव आहे.एलसीबी पथकाने बाभुळगाव येथे साठवणूक केलेल्या गुटखा गोदामावर धाड टाकत ९८ लाख ३१ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अहेफज मेमन याला अटक केली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी हा गुन्हा एलसीबीकडे वर्ग केला. एलसीबी पथकाने अहेफज मेमन याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर एलसीबी पथकाने यातील सराईत गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसून अहेफज याची चौकशी सुरू केली. यावेळी अहेफज याला प्रतिबंधित गुटख्याचा माल अमरावती येथील व्यापारी विक्रम उर्फ विक्की मंगलानी याने पुरवल्याची कबुली दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.