आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेमेंट:आता एसटीचे तिकीटही ऑनलाइन पेमेंटने मिळणार

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ऑनलाइन पेमेंटचे सारे व्यवहार व्यापलेले असताना एसटी सेवा अद्याप त्यापासून दूर आहे. प्रवासामध्ये तिकिटासाठी अजूनही रोख पैसे द्यावे लागतात. सुट्या पैशासाठी वाहकांसोबत अजूनही प्रवाशांना वाद घालावा लागतो.

बदलत्या काळात राज्य परिवहन महामंडळ (एसटीनेही) बदलण्याचा निर्णय घेतला असून ऑनलाइन पैसे देण्याची सुविधा लवकर उपलब्ध केली जाणार आहे. वाहकांना अँड्रॉइड प्रणालीवर आधारित तिकीट मशीन उपलब्ध करून देणार आहे. त्याद्वारे प्रवाशांकडून ऑनलाइन पेमेंट स्वीकारता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाची महत्त्वाची बैठक आठवडा भरा पूर्वी पार पडली. यात ऑनलाइन व्यवहाराचाही निर्णय घेण्यात आला आहे. तिकिटांची सध्याची ईटीआय मशीन अँड्रॉइड प्रणालीला जोडण्याचा निर्णय झाला.

बातम्या आणखी आहेत...