आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:आता 24तासांत मिळणार स्वाईन फ्लूचा अहवाल ; विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत चाचणी

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कोविड १९ प्रयोगशाळेत स्वाइन फ्लू चाचणी करण्याबाबत आरोग्य विभागाने सहा दिवसांपूर्वीच परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रयोगशाळा यंत्रणेने स्वाइन फ्लूची चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या आरटीपीसीआर किट बोलावल्या होत्या. दरम्यान ९४ किट मागवल्या असून, रविवारी रात्रीपर्यंत प्रयोग शाळेला प्राप्त होणार आहेत. त्यामुळे सोमवारपासून (दि. २९) विद्यापीठातील लॅबमध्ये स्वाइन फ्लू चाचणी होणार आहे.

मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील काही रुग्णांमध्ये स्वाइन फ्लू सदृश आजारांची लक्षणे दिसत आहे. त्यामुळेच वैद्यकीय यंत्रणेकडून संशयित रुग्णाचे नमुने घेऊन तपासणी सुरू केली आहे. मात्र अमरावतीत स्वाइन फ्लू चाचणी शक्य नसल्यामुळे खासगी रुग्णालयातून नागपूर, तर शासकीय रुग्णालयातील संशयित रुग्णांचे नमुने पुणे येथील एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी) येथे पाठवण्यात येत आहेत. परंतु दोन्ही ठिकाणांहून नमुने तपासणी करून अहवाल प्राप्त होण्यासाठी किमान तीन ते चार दिवसांचा अवधी लागतो आहे. दरम्यान तीन दिवसांपूर्वीच सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील एका ६० वर्षीय रुग्णाचा नमुना स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान ज्या प्रयोगशाळेत कोविड १९ विषाणू तपासणीसाठी येईल, त्या प्रयोगशाळेत स्वाइन फ्लूची चाचणीसुद्धा करता येते. त्यामुळे ती सुरू करावी, असे आदेश सहा दिवसांपूर्वी आरोग्य संचालकांनी दिले होते.

आमची तयारी पूर्ण झाली
जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला स्वाइन फ्लू चाचणीसाठी आवश्यक आरटीपीसीआर किटची मागणी मंजूर झाली असून सोमवारी सकाळपर्यंत १०० रिअॅक्शन (९४ किट) आम्हाला प्राप्त होणार आहेत. सोमवारी दुपारनंतर नमुने प्राप्त झाल्यास तपासणीची प्रक्रिया सुरू करणार आहे. त्यासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली.
प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे, नोडल अधिकारी, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ.

बातम्या आणखी आहेत...