आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:न.प. हद्दवाढीमुळे 15 सदस्यीय गायवाडी ग्रामपंचायत बरखास्त; विभागीय आयुक्तांचे धडकले आदेश

दर्यापूर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मोठी व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असणाऱ्या गायवाडी ग्रामपंचायतीची १५ सदस्यीय बॉडी बरखास्त करण्यात आल्याचे पत्र विभागीय आयुक्तांचे पत्र दर्यापूर तहसील व पंचायत समिती प्रशासशनाला गुरुवार (दि. ५) दुपारी उशीरा प्राप्त झाले आहे. या आदेशाने गायवाडी सर्कलमध्ये एकच खळबळ उडाली असून त्यामुळे कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले आहे.

शासनाच्या आदेशानुसार शहराला लागून असलेला गायवाडी ग्रामपंचायती अंतर्गत येणारा साईनगर आदी परिसर हद्दवाढीमुळे आता नगर पालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. मार्च महिन्यात प्रभाग रचनेच्या प्रसिद्ध प्रारूप आराखड्यात ११ व १२ अशी हद्दवाढ झालेल्या भागाचे २ नवीन प्रभाग दर्शवण्यात आले असून ४ नगरसेवक या परिसरातून आगामी नगरपालिका निवडणुकीत निवडले जाणार आहेत. हद्दवाढीच्या अनुषंगाने विभागीय कार्यालयात ४ मे रोजी गायवाडी ग्रां. प.च्या सर्व १५ सदस्याना म्हणने मांडण्याकरिता बोलावण्यात आले होते. या सुनावणीच्या वेळी १५ सदस्यांपैकी केवळ ७ सदस्य उपस्थित होते. अन्य आठ सदस्यांनी सुनावणी दरम्यान ग्रा.पं. क्षेत्रातील वॉर्ड क्रं. ३, ४ व ५ मधील संपूर्ण भाग पालिकेत समाविष्ट झाल्यामुळे बाॅडी बरखास्त करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे लेखी दिले होते.

अखेर गायवाडीचे सरपंच, उपसरपंचासह सर्व बॉडी बरखास्त करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालयातून स्थानिक प्रशासनास प्राप्त झाले आहेत. आता गायवाडी येथे प्रशासक लागू होणार, तर दुसरीकडे साईनगर हद्दवाढीमुळे नगर पालीका निवडणूक घडामोडींबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.

बातम्या आणखी आहेत...