आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रमांक:शहरातील 1.62 लाख मालमत्तांना दिले क्रमांक

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेद्वारे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण व मूल्यांकनाचे काम सुरू करण्यात आले. याअंतर्गत आतापर्यंत १ लाख ६२ हजार मालमत्तांना क्रमांक दिले असून ५४ हजार इमारतींच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले. आणखी बरेच काम शिल्लक असून ते पूर्णत्वासाठी २ महिने लागणार आहे. त्यामुळे मनपाकडे नोंद असलेल्या मालमत्तांपेक्षा निश्चितच शहरातील मालमत्तांमध्ये भर पडणार आहे.

याआधी मनपाकडे १ लाख ६० हजार मालमत्तांची नोंद होती. मालमत्तांचे मूल्यांकन करणाऱ्या एजन्सीने आतापर्यंत १ लाख ६२ हजार मालमत्तांना क्रमांक दिले आहेत. याचाच अर्थ मनपाकडे नोंद असलेल्या मालमत्तांपेक्षा २० नोव्हेंबरपर्यंत २ हजार मालमत्ता वाढल्या. यात इमारती, गाळे, फ्लॅट्स, भूखंड, नवीन निर्माणाधीन घरे, सीमावर्ती भागात नुकतीच बांधण्यात आलेली घरे, दुकाने, अर्धवट तयार करून सोडलेले बांधकाम अशांचा समावेश आहे. आणखी २ महिने एजन्सीद्वारे सर्वेक्षण आणि क्रमांक देण्याचे काम चालणार आहे. यात निश्चितच शहरातील मालमत्तांमध्ये भर पडून मनपाला आधीच्या तुलनेत जास्त प्रमाणात मालमत्ता कर मिळणार आहे. ४० टक्के मालमत्ता कर वाढीला स्थगिती दिलेली असली तरी स्वच्छता कर हा वाढीव घेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...