आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक पोषण सप्ताह:झोपडपट्टी परिसरात पोषण विषयक जनजागृती ; सांगळूदकर महाविद्यालयाचा उपक्रम

दर्यापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित शहरातील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयात प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली गृह-अर्थशास्त्र विभाग, महिला सल्लागार समिती व महिला तक्रार निवारण समिती यांच्या संयुक्त सहकार्याने जागतिक पोषण सप्ताह निमित्ताने शहरातील झोपडपट्टी परिसरामध्ये जावून तेथील नागरिकांना फळ वाटप करून पोषणाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी आहारामध्ये फळे व हिरव्या पालेभाज्या किती महत्त्वाच्या आहेत, लहान मुलांना त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक मिळाले, तर नवजात बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण कमी होईल, म्हणून पोषणासंबंधी जनजागृती करणे हा उद्देश समोर ठेवून महाविद्यालयातील प्रा. डॉ. ज्योत्स्ना पुसाटे, डॉ. मृणाल कडू, डॉ. वैशाली चोरपगार तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी तेथील नागरिकांना फळे वाटप करून आहार विषय सूचना देवून पोषणाबाबत जनजागृती केली.

बातम्या आणखी आहेत...