आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजेरी:शहरात तुरळक पावसाची हजेरी

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण असून, दोन्ही दिवस पाच ते दहा मिनिटे हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. हवेतील आद्रता वाढल्यामुळे थंडी नाहीशी झाली असून कडाक्याच्या थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरात सुमारे १० मिनिटे तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्ते ओले झाले. तसेच कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली. अनेकांना डोक्यावर रुमाल ठेऊन पावसापासून स्वत:चा बचाव करावा लागला. आवश्यक कामानिमित्त घराबाहेर पडलेल्यांनी छत्र्या उघडल्या. शहरात आज कमाल तापमान २४ अंश तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहिल्याची माहिती हवामान केंद्राद्वारे देण्यात आली. भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या अमरावती जिल्ह्याच्या हवामान अंदाजानुसार पुढील पाच दिवशी कमाल तापमान २८.४ ते २८.८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १७.६ ते २० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...