आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचार:तिवसा बसस्थानकासमोर एसटी‎ बसच्या धडकेत वृद्ध ठार‎

तिवसा12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बसस्थानकासमोर एसटी बसच्या‎ धडकेत जखमी झालेल्या ९० वर्षीय वृद्धाचा अमरावती‎ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवारी‎ सकाळी ११ वाजता घडली. भानुदास अमृतराव खारकर‎ (९०, रा. वाठोडा खुर्द, ता. तिवसा) असे बसच्या धडकेत‎ ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.‎ घटनेच्या वेळी मृतक खारकर हे बसस्थानकासमोरील‎ रस्त्याने जात असताना अचानक चांदूर रेल्वे आगाराच्या‎ बसची (एमएच ४०/ वाय ५२३७) त्यांना धडक बसली.‎ त्यात त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते. त्यांना जखमी‎ अवस्थेत तातडीने तिवसा ग्रामीण रुग्णालयात‎ उपचारासाठी आणले. तेथे प्राथमिक उपचार करून‎ तातडीने पुढील उपचारासाठी अमरावती येथे दाखल‎ करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.‎

बातम्या आणखी आहेत...