आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:मुलीच्या विनयभंगप्रकरणी वृद्धाला तीन वर्षांची शिक्षा

अमरावती6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकवणी वर्गावरून घरी जाणाऱ्या एका १२ वर्षीय मुलीला पेढा देण्याच्या बहाण्याने घरात बोलावून विनयभंग करणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धा विरुद्ध दोष सिद्ध झाला. त्यामुळे जिल्हा व सत्र (क्रमांक ५) न्यायाधीश पी. एन. राव यांच्या न्यायालयाने वृद्धाला तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. हा निर्णय न्यायालयाने शनिवारी (दि. ३०) दिला आहे.

यशवंत गंगारामजी तायडे (६५, रा. तपोवन परिसर, अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १९ ऑक्टोबर २०१६ ला सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही शिकवणी वर्गावरुन घरी परत जात होती. त्याचवेळी यशवंत तायडे तिला रस्त्यात भेटला. त्यावेळी तायडेने मुलीला पेढा देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. तायडे परिचित असल्यामुळे मुलगी त्याच्या घरात गेली. त्यावेळी तायडेने आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श करुन मुलीचा विनयभंग केला. त्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांत तक्रार देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...