आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:अभिरूची कला मंडळाच्या स्नेह मिलन सोहळ्याने जागवल्या जुन्या आठवणी

अमरावती7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जुनी व नामवंत संस्था असलेल्या अभिरुची कला व क्रीडा मंदिराच्या स्नेह मिलन सोहळ्याद्वारे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. ३५ वर्षांपूर्वी विविध कला-गुणांचा सराव करणारे तत्कालीन मित्र एकत्र आल्यामुळे हा सोहळा अत्यंत बहारदार झाला.

अभिरूचीशी जुळलेले जुने-नवे खेळाडू, कलावंत तथा सभासदांचा कौटुंबीक परिचय व्हावा या दृष्टीकोनातून शिक्षक बँकेचे संचालक संजय भेले आणि त्यांचे सहकारी राहुल चानपुरकर, विजय पांडे, राजु आलसेट, राजु लेवटकर, अतुल तायडे, किशोर बोंडे यांनी हा सोहळा आयोजित केला होता. खेळाडू आणि कलावंत म्हणून ज्यांनी अमरावती शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, असे जुने-नवे सर्व खेळाडू या निमित्याने उपस्थित झाले होते. खेळाडू संजय नाईक यांनी भारतीय व्हॉलीबॉल संघाचे नेतृत्व केले असून, महाराष्ट्र संघटनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देवून गौरविले आहे. याशिवाय मनिषा सहस्रबुद्धे यांनासुद्धा छत्रपती पुरस्काराने सन्मानित केले असून मंडळाचे मार्गदर्शक प्रा एम. टी. देशमुख क्रीडा संघटक म्हणून छत्रपती पुरस्काराने शासनाने गौरविले आहे.

मंडळाच्या अनेक पुरुष व महिला व्हॉलिबॉल खेळाडूंनी ज्युनिअर स्पर्धा, आंतरविद्यापीठ स्पर्धा, राज्यस्पर्धा, इंडियन युनिव्हर्सिटी स्पर्धा, ओपन स्पर्धा यामध्ये उत्तम कामगिरी बजावली असून मंडळाला व अमरावतीकरांना त्यांचा सार्थ अभिमान आहे. मंडळाच्या काही महिला व पुरुष खेळाडू व्हॉलीबॉलच्या माध्यमातून शासकीय संस्थेत नोकरीला आहेत. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांचा कौटुंबिक परिचय करून देण्यात आला. संचालन संजय भेले यांनी तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन विजय पांडे यांनी केले. अतुल तायडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू विनोद राठी, विजय हरणे, राजकुमार पुरोहीत, सोनु पन्नासे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...