आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:रक्षाबंधन आठवड्यावर; राख्यांनी सजला बाजार

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहीण-भावातील अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे यंदा बाजारात वेगवेगळ्या आकर्षक डिझाइनच्या राख्या आल्या आहेत. रक्षाबंधन सणासाठी रंगबिरंगी, विविध कलाकुसर केलेल्या आकर्षक राख्यांनी बाजार फुलला असून, नागरिकांची खरेदीसाठी बाजारात लगबग दिसून येत आहे.

दरवर्षी रक्षाबंधनला बाजारात नवनवीन प्रकारच्या राख्या येत असतात. यावर्षी नारळी पौर्णिमा आणि स्वातंत्र्य दिन हा तीन दिवसांच्या फरकाने आल्यामुळे राख्यांमध्ये तिरंग्याची झलक पहायला मिळत आहे. यंदा फॅन्सी राख्यांसह पारंपरिक राख्या खरेदीकडे कल दिसून येत आहे. तर, लहान मुलांमध्ये तिरंगा राख्यांसह छोटा भीम, मोटू पतलू, स्पायडर मॅन, किड्स टॉय, डोरेमॉन अशा राख्यांना अधिक मागणी आहे.

या राख्यांमध्ये लाइट, संगीताची धून तसेच, आतून कॅमेरा अशा काही हटके राख्याही पहायला मिळत आहेत. तसेच, ब्रो, बडे मिया, स्वॅग भाई अशा नावांचे डिझाइन असलेल्या पेंडण्टच्या राख्याही दिसून येत आहेत. या राख्यांवर संदेश किंवा नाव लिहिलेल्या विशेष राख्या बाजारात दिसून येत आहेत. राख्या ५ रुपयांपासून ते २०० रुपया पर्यंत बाजारात विक्रीला उपलब्ध आहेत. अमरावतीच्या बाजारात कोलकत्ता, गुजरात, मुबंई, अलाहाबाद येथून माल येतो. राख्यांमध्ये मोती, जरी आणि जरदोजीच्या राख्या अत्यंत साध्या आणि सुंदर असल्यामुळे त्यांना अधिक मागणी आहे. स्टोन, कुंदन वर्क, कलर्ड, बीड्स, घुंघरू, लाख, मिरर वर्क असलेल्या राख्या अधिक लक्ष वेधून घेत आहेत.

भावाचे बहिणीला गिफ्ट; चॉकलेट बॉक्स उपलब्ध
बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांची चॉकलेट, गिफ्ट पॅकेट दाखल झाली आहेत. रक्षाबंधनाला बहुतेक भाऊ-बहिणीला गिफ्ट म्हणून चॉकलेट बॉक्स देतात. कॅटबेरी, स्ट्रॉबेरी कॅरेमल, आॅरेंज असे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

लुंबी, स्टोन सारख्या राख्यांना वाढती मागणी
लहान मुलांमध्ये कार्टुनच्या राख्यांना अधिक मागणी आहे. या राख्या अगदी ५ रुपयांपासून दोनशे रुपयांपर्यंत आहेत. तसेच लुंबी, स्टोन सारख्या राख्यांच्या प्रकाराला अधिक मागणी आहे. प्रकाश हिंदूजा, राखी विक्रेते.

बातम्या आणखी आहेत...