आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांचा जनसागर उसळला:ऋषिपंचमीला भाविकांनी दुमदुमली कौंडण्यपूरनगरी

कुऱ्हाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भाची पंढरी आणि आई रुख्मिणी मातेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे ऋषिपंचमीनिमित्त दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळला होता. संपूर्ण नगरी दुमदुमली होती. ऋषिपंचमीच्या पर्वावर राज्याच्या कानाकोपनऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर, श्री अंबिका देवी मंदिर, इस्कॉन मंदिर, शिव मंदिर, गजानन महाराज मंदिर आदी मंदिरावर भाविकांची एकच गर्दी उसळली होती.

विशेष म्हणजे वर्धा नदीवर स्नान करण्यासाठीही भाविकांची गर्दी दिसून आली. भाविकांची गर्दी पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी कुऱ्हाचे ठाणेदार संदीप बिरांजे, दुय्यम ठाणेदार गणेश सपकाळ, पोहेकॉ अनिल निंघोट, सोमेश्वर सपाटे, प्रमोद ठाकरे, सतीश ठवकर, सागर निमकर, रवींद्र भुताडे, हेमंत डहाके, योगेश नेवारे व महिला पोलिस कर्मचारी आणि अमरावती ग्रामीण पोलिस, होमगार्ड आदींचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...