आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी जोमात काम करु:अचलपूरमधील शिवसैनिकांचे उद्धव ठाकरेंना आश्वासन

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात शिवसेना उध्दव ठाकरे की बंडखोर एकनाथ शिंदे यांची असे राजकिय चित्र निर्माण झाले असताना अचलपूर तालुक्यातील शिवसैनिकांनी नुकताच मुंबई येथे जाऊन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा केल्यानंतर आम्ही मातोश्रीचे शिलेदार असल्याचे वचन देत शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी जोमात काम करु असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

अचलपूर गाव ठाकरे कुटुंबीयांशी जुळलेले

अचलपूर हे ठाकरे कुटुंबीयांशी जुळलेले गाव आहे. ठाकरे कुटुंबातील सध्याच्या पिढीचे ते आजोळ आहे. त्यामुळे येथील शिवसैनिकांना ठाकरे कुटुंबीयांबद्दल विशेष प्रेम व जिव्हाळा आहे. या पार्श्वभूमीवर आजोळ तुमच्या पाठिशी आहे, हे सांगण्यासाठी येथील शिवसैनिक मातोश्रीवर गेले होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी समस्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत जनसामान्यांच्या कामासाठी लढा देत सतत कार्यरत रहा, असे निर्देश दिले. याप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नरेंद्र पडोळे, माजी नगराध्यक्ष सुनिता फिस्के, नरेंद्र फिस्के, धीरज सातपुते, नरेश भाकरे, विलास सोळंके, संदीप लव्हाळे, भास्कर सरसाऊ, नितीन घटाळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

विदर्भ शिवसेनेचा बालेकिल्ला

विदर्भ हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. वाशिम जिल्ह्याचा अपवाद वगळता येथील बहुतेक पदाधिकारी मूळ शिवसेनेसोबत आहे. शिवाय प्रबोधनकार ठाकरे आणि अचलपूर हे जुने समीकरण असल्याने अमरावती जिल्हा तर यापूर्वीच्या फुटीवेळीही ठाकरे कुटुंबीयांसोबतच राहिला आहे. या पार्श्वभूमीवर येथील शिवसैनिकांनी घेतलेली भेट महत्वपूर्ण असून भविष्यातील संघटनात्मक पकड मजबूत करण्यासाठीची ती एक नांदी आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

बातम्या आणखी आहेत...