आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • On The Occasion Of Ganeshotsav, 56 Types Of Sweets And Different Modaks Are Also Available In The Market, The Prices Of Flowers Have Increased; Vehicle Fares Are Expensive

गणेशोत्सवानिमित्त बाजारात 56 प्रकारची मिठाई:वेगवेगळे मोदकही उपलब्ध फुलांचे दर वाढले; वाहनांचे भाडे महागले

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठोक बाजारात मिठाईच्या दुकानात उपलब्ध एक पाव ते सव्वा किलो वजनाचे मोदक. - Divya Marathi
ठोक बाजारात मिठाईच्या दुकानात उपलब्ध एक पाव ते सव्वा किलो वजनाचे मोदक.

खास गणेशोत्सवानिमित्त अमरावतीतील हलवाईंनी ५६ प्रकारची मिठाई आणि डझनभराहून अधिक प्रकारचे मोदक तयार केले आहेत. विशेष असे की गणेश विसर्जनाच्या पर्वावर मिठाईसह फुले, फळांची मागणी वाढली आहे. याशिवाय विसर्जनासाठी भाड्याच्या वाहनांची मागणीही वाढली आहे.

बाजाराचा फेरफटका मारला असता यावर्षी पहिल्यांदाच एक पाव ते सव्वा किलो वजनाचे मोदक मिठाईच्या दुकानात दिसून आले. यामध्ये मावा, काजू, खोबरे, मोतीचूर, मैदा आणि गुलकंदच्या मोदकांचा समावेश आहे. मिठाईसाठी प्रसिद्ध असलेल्या रघुविर प्रतिष्ठानने एक पाव ते सव्वा किलो वजनाचे मोदक तयार केले आहेत. याशिवाय बाप्पाला छप्पनभोग चढविता यावा म्हणून छप्पन प्रकारच्या मिठाईदेखील येथे उपलब्ध आहेत. विशेष असे की या सर्व मिठाई एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांनी त्यासाठीची फिरती ट्रॉलीदेखील उपलब्ध करुन दिली असल्याचे संचालक तेजस पोपट यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

विसर्जनासाठी ट्रॅक्टरला पसंती

शहरात बहुतांश मोठ्या मुर्तीच्या विसर्जनासाठी ट्रॅक्टर ट्राॅलीचा वापर केला जातो. तर मध्यम आकाराच्या मुर्तींसाठी टाटा एस हे वाहन वापरतात. या दोन्ही वाहनांचे भाडे इंधन धरून खर्च ३ ते ४ हजार रुपये येते. इंधन दर वाढल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यात १० टक्के वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे विद्युत रोशनाई व प्रकाशझोतासाठी लहान, मोठे जनरेटर वापरले जाते. त्यासाठी प्रतितास आकारमानानुसार १५०० ते ३ हजार रुपये खर्च येतो. अशाप्रकारे तीन तासांच्या मिरवणुकीसाठी ५ ते १० हजार रुपयांचा खर्च मंडळांद्वारे केला जातो.

गुलाब, शेवंतीचे दर वाढलेलेच

गणेशोत्समुळे अद्यापही फुलांचे दर वधारले आहेत. त्यातल्या गुरूवारी फुल बाजारामध्ये झेंडुच्या फुलांचे दर ४० रुपये किलो होते. तर पांढरी शेवंती, रंगीत शेवंती, अस्टर, गुलाब, निशिगंधा, जरबेरा या फुलांचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर होते. शेवंती, अस्टर, गुलाब ३०० रुपये प्रतिकिलोच्या पुढे होते. शहरात शेवंती, झेंडू जालना येथून येतात, तर गुलाबाची फुले शिर्डी, हैद्राबाद येथून आणली जातात. गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी फुलांची चांगली मागणी राहणार असल्याची माहिती फुल व्यावसायिक गाेपाल टोपले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...