आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुतात्मा दिवस पार:महात्मा फुले इंग्रजी प्राथमिक शाळेत‎ हुतात्मा दिवसानिमित्त प्रतिमा पूजन‎

शेंदुरजनाघाट2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महात्मा फुले इंग्रजी‎ प्राथमिक शाळेत नुकताच हुतात्मा दिवस पार पडला.‎ या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना मोघे यांनी‎ महात्मा गांधी यांच्या फोटोचे पूजन व हरार्पण करून‎ कार्यक्रमाची सुरुवात केली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी‎ आपल्या भाषणातून गांधीजींच्या जीवन कार्याविषयी‎ माहिती सांगीतली. वेदांत गिरी, तन्वी वंजारी, महिमा‎ जोगेकर वांशिका खेरडे यांनी गीत सादर केले.‎

गायत्री आंडे यांनी गांधीजींच्या जीवनातील काही‎ प्रसंग विद्यार्थांना सांगीतले तसेच या दिवसाला‎ हुतात्मा दिवस का म्हणतात याविषयी मार्गदर्शन‎ केले. कार्यक्रमाला सर्व शिक्षिका, इतर कर्मचारी,‎ नेहा खान, मेघा मोरे, स्नेहल गोरडे, नेहा भोगे,‎ शुभांगी पांडे, करुणा भोयर, माधुरी निमकर, वनिता‎ फुटाणे व वैभव सावरकर उपस्थित होते. उपस्थित‎ सर्व शिक्षिका कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मौन‎ श्रद्धांजली अर्पण केली.‎

बातम्या आणखी आहेत...