आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) ते बसस्थानक या मार्गाला स्व. डॉ. सुरेश ठाकरे यांचे नाव देण्यात आले. शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत एका दिमाखदार सोहळ्यात नामकरणाचा हा विधी पार पडला. डॉ. सुरेश ठाकरे यांनी आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक, अशा विविध कार्यातून शहराची सेवा केली. त्यांचे कार्य चिरकाल स्मरणात राहील, अशा भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शंकरराव गावंडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष सुधाकर नाकील, हरी शंकर अग्रवाल, हाजी रफिक सेठ, सुनीता फिस्के व प्रमोद कोरडे, माजी प्राचार्य रा.भा. महाजन, श्रीमती ठाकरे मंचावर उपस्थित होते. अचलपूर नगरपालिकेने काही महिन्यापूर्वीचा सर्वसाधारण सभेत माजी नगराध्यक्ष सुनीता फिस्के यांच्या अध्यक्षतेखाली ठराव मंजूर करत हा प्रस्ताव मंजूर केला होता. या प्रस्तावाला अनुसरुन बुधवारी या नामकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत भावपूर्ण असा हा कार्यक्रम जुळया शहरवासीयांना अभिमान वाटेल, अशा पद्धतीने पार पडला. यावेळी मान्यवरांनी डॉ. सुरेश ठाकरे यांनी शहरासाठी दिलेल्या नि:स्पृह सेवेचा आपल्या भाषणातून उल्लेख केला.
प्रारंभी डॉ. सुरेश ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ नीलेश तारे यांनी प्रास्ताविक करत कार्यक्रमाची रुपरेखा विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पदमाकर घोगरे, तर आभार डॉ कौस्तुभ ठाकरे यांनी मानले. याप्रसंगी शहरातील शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक, राजकिय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कामासाठी पुढाकार घेणाऱ्या माजी नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रमाच्या सुरुवातीस शहरातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या रस्ता नामकरणाचे अनावरण करण्यात आले. याकरिता पुढाकार घेणारे माजी नगरसेवक सल्लुभाई, माजी आरोग्य सभापती बंटी ककरानीया, अनिरुद्ध मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.