आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणचा दिलासा:वीज ग्राहकांना पुन्हा एकदा नव्याने संधी ; योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वीजबिल भरले नाही म्हणून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना महावितरणने दिलासा दिला आहे. महावितरणने विलासराव देशमुख अभय योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे घरगुती ग्राहकांसोबतच व्यवसाय व उद्योगांना पुनरुज्जीवनाची नव्याने संधी उपलब्ध झाली आहे.

विलासराव देशमुख अभय योजनेनुसार कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना हप्तेवारी अथवा एकरकमी देयक भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णत: माफ करण्यात येत आहे. या योजनेमध्ये ३१ डिसेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक पात्र आहेत. ही योजना सुरुवातीला १ मार्च ते ३१ ऑगस्ट पर्यंतच लागू होती. परंतु, ग्राहकांच्या मागणीमुळे या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ज्या ग्राहकांचे अर्ज ३० सप्टेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज मंजूर केले आहेत त्यांनी ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत थकबाकीच्या ३० टक्क्यांचा पहिला हप्ता किंवा संपूर्ण थकबाकी एकरकमी भरावयाची आहे. हप्तेवारीचा लाभ घेणारा ग्राहक हप्ता भरण्यास अपयशी ठरल्यास तो ग्राहक या योजनेतून अपात्र ठरेल आणि त्यास कोणतेही लाभ दिले जाणार नसल्याचेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

यामध्ये ग्राहकांना एक रकमी तसेच हप्तेवारी दोन्ही पद्धतीने पैसे भरण्याची सुविधा आहे. वीज जोडणीसाठी ९० टक्के अर्ज मंजुरीच्या ३० दिवसाच्या आत कायदेशीर शुल्क भरता येणार आहे. विलासराव देशमुख अभय योजनेच्या लाभासाठी ३१ डिसेंबर २०२१ किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक हे पात्र राहणार आहेत. त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना खंडित वीजपुरवठा पुनरुज्जीवित करता येणार आहे. व्याज विलंब आकार माफ या योजनेनुसार थकबाकीची मूळ रक्कम हप्तेवारीने अथवा एक रकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...