आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साप चावला:एकदा साप चावला अन् तो चक्क सर्पमित्र बनला

धामणगाव रेल्वे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा बिनविषारी साप चावला तेव्हापासून तालुक्यातील ढाकुलगाव येथील एका युवकाने सापांना जीवनदान देण्याचा संकल्प करत त्यासाठी पुढाकार घेतला. गेल्या दहा वर्षांत त्याने आतापर्यंत अनेक विषारी व बिनविषारी सापांना जीवनदान दिले. सेंट्रल फॉर अॅनिमल रिसर्च अँड स्टडीच्या मार्गदर्शनात अश्फाक शहा हा सर्पमित्र झाला. तालुक्यातील सर्पमित्र अश्फाक शहा याला १० वर्षांपूर्वी एका बिनविषारी सापाने दंश केला. त्या वेळी तो घाबरला. जीवाच्या आकांताने रडू लागला व रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. तेव्हा दंश केलेला साप हा बिनविषारी असल्याचे त्याला समजले.

आपल्याला साप चावला, तर भीतीपाेटी व माहितीच्या अभावाने झालेला त्रास इतरांना होऊ नये यासाठी त्याने सर्पमित्र होऊन सापांशी मैत्री करण्याचे ठरवले. आता अश्फाक वस्तीसह शहरात निघणाऱ्या सापांना धरून जंगलात सोडण्याचे काम करत आहे. वयाच्या अठराव्या वर्षापासून सापांना जीवनदान देण्यासाठी झटत आहेत. त्यासाठी अमरावती येथील सेंट्रल फाॅर अनिमल रिसर्च स्टडी या संस्थेचे सहकार्य मिळत आहे. त्यांच्यासोबत बबलू दिवेदी, गणू चव्हाण, तुषार मंडवगणे, मयूर राठी व करण शेंडे या सर्पमित्रांची टीम तालुक्यात व परिसरात काम करत आहे.

भीतीपोटी सापाला मारून पर्यावरण असंतुलित करू नका
साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो शेतातील उंदरांची संख्या कमी करून अप्रत्यक्षरीत्या मदत करतो. साप दूध पित नाही. जीवाच्या भीतीपोटी त्याला मारून पर्यावरणाचे संतुलन बिघडू देऊ नये. साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी त्याला साथ दिली पाहिजे.अश्फाक शहा, सर्पमित्र.

सर्पमित्र झाल्यापासून फक्त एक वेळा दंश
महाराष्ट्रात सापांच्या जवळपास ३५ प्रजाती आढळतात. त्यामध्ये परड, नाग, घोणस, मण्यार, फुरसे या जाती विषारी असून, बिनविषारी सापांमध्ये धामण, कवड्या, धिवड, तस्कर, कुकरी व गवत्या आदी जातीचा समावेश असताे. सापांना हाताळत असताना आतापर्यंत अश्फाक शहा यांना केवळ एक वेळा दंश केला आहे. दंश होता क्षणी त्यांनी ब्लेडने स्वतः रक्त बाहेर काढले आणि सर्पदंश झालेल्या शरीराच्या वरील भागाला पट्टीने बांधून विष पसरण्यापासून तत्काळ थांबवले.

बातम्या आणखी आहेत...