आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:पुन्हा एकाला कोरोनाची‎ बाधा; सक्रिय रुग्ण सहा‎

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज, सोमवारच्या‎ वैद्यकीय चाचणीत मनपा क्षेत्रातील‎ साईनगर निवासी ३९ वर्षीय पुरुषाला‎ कोरोनाची लागण झाल्याचे पुढे‎ आले आहे. त्यामुळे एकूण सक्रीय‎ रुग्णांची संख्या सहावर पोहोचली‎ आहे. मनपा क्षेत्रातील गोपालनगर‎ भागातील तिघांना कोरोनाची लागण‎ झाल्याचे शनिवारच्या वैद्यकीय‎ तपासणीत स्पष्ट झाले होते. त्यामुळे‎ त्यांच्यासह आधीचे दोन आणि‎ आजचा एक अशी सहा ही संख्या‎ सद्या स्थिर आहे. या नव्या‎ संख्येमुळे जिल्ह्यातील‎ आतापर्यंतच्या एकूण‎ कोरोनाबाधीतांची संख्या १ लाख ७‎ हजार १३६ झाली आहे. त्यापैकी १‎ लाख ५ हजार ५०२ रुग्णांनी‎ कोरोनावर विजय प्राप्त करीत सुटी‎ घेतली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...