आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षेला दांडी:पीएचडीच्या पूर्वपरीक्षेला दीड हजार विद्यार्थ्यांनी मारली दांडी

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संशोधन प्रवृत्तीला बळ देणाऱ्या पीएचडीच्या पूर्व परीक्षेला (एम-पेट) दीड हजार विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. या परीक्षेसाठी एकूण ५ हजार २८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परंतु त्यापैकी ३ हजार ७३२ संशोधक विद्यार्थीच परीक्षेला प्रविष्ट झाले. अशाप्रकारे १ हजार ५४९ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलीच नाही.

पीएचडीसाठीच्या परीक्षेसाठी विद्यापीठाच्या पाचही जिल्ह्यात ११ केंद्रे उघडण्यात आली होती. सर्वाधिक ५ केंद्रे अमरावती जिल्ह्यात होती. याशिवाय बुलडाण्यात ३, यवतमाळात २ आणि अकोला व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी एक केंद्र उघडण्यात आले होते. रविवार दि. ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते १ आणि दुपारी ३ ते ५ अशाप्रकारे दोन फेऱ्यांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेतील संपूर्ण प्रश्न वस्तुनिष्ठ (एमसीक्यू) होते आणि ते संगणकाचा वापर करुन ऑनलाईन सोडवायचे होते. त्यामुळे एकूण परीक्षार्थ्यांना दोन फेऱ्यांमध्ये विभागून घ्यावे लागले, असे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे.

दरम्यान एम-पेट चा निकाल येत्या दीड महिन्याच्या आत घोषित केला जाणार असून तशी तयारी विद्यापीठ प्रशासनाने केली आहे. विद्यापीठ प्रशासनाच्या मते नवे शैक्षणिक धोरण अंमलात आल्याने एम-पेट चे स्वरूपही बदलणार आहे तर दुसरीकडे संशोधक विद्यार्थ्यांच्या मते यापुढे एम-पेट ऐवजी दुसरा पर्याय वापरावा लागणार असल्याने यावेळी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एम-पेटचा अर्ज दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...