आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सद्या कोरोनाचा एकमेव रुग्ण उपचार घेत आहे. परंतु हा शेवटचा रुग्ण म्हणावा, असे धाडस करता येणार नाही. जिल्ह्यासह अख्ख्या देशाला गेल्या तीन वर्षांपासून कोरोनाने आपल्या दहशतीखाली ठेवले आहे. पहिली दोन वर्षे कडक लॉकडाऊन, लागण झाल्यास विलगीकरण, उपचार अशा साखळीचा मारा सहन करावा लागला. कोरोनामुळे अनेकांचे रोजगारही बुडाले. त्यामुळे कोरोना एकदाचा केव्हा संपतो, असा सर्वांचाच प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीत केवळ एकच रुग्ण शिल्लक असणे, याकडे वेगळ्या भूमिकेतून पाहिले जात आहे.

दरम्यान गेल्या २४ तासांत जिल्ह्यात कुणालाही नव्याने कोरोनाची लागण झाली नाही. परंतु गेल्या आठवड्यात बाधित झालेल्या रुग्णांपैकी मनपा क्षेत्रातील एक जण अजूनही विलगीकरणातच आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार १२२ वर पोहोचली असून सुटी घेऊन घरी गेलेल्यांचा आकडा १ लाख ५ हजार ४९३ झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...