आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसुली:एक काेटी 89 हजारांच्या पाणी-घरपट्टीची वसुली

अकाेला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय लाेकन्यायालयात १ काेटी ८९ लाख १७,५७७ रूपयांचा घर व पाणी कर वसूल झाला. ४,८७९ खातेदारांनी या कराचा भरणा केला. हे सर्व जण ५३५ ग्रामपंचायतमधील थकबाकीदार आहेत.

जिल्ह्यात विविध प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनांच्या माध्यमातून ग्रामस्थांना पिण्याच्या पाणी पुरवठा करण्यात येताे. यात ८४, ६४ खेडी पाणी पुरवठा याेजनांचा समावेश आहे. मात्र अनेकांपर्यंत पाणीच पाेहाेचत नाहीत. तसेच काही ठिकाणी १५ पेक्षा जास्त िदवसांनी पाण्याचा पुरवठा हाेता. त्यामुळे ग्रामस्थही पाणी पट्टी भरण्याकडे दुर्लक्ष करतात. या कारणांसह पुरेसे मनुष्यबळ नसणे आदींमुळे पाणी पट्टी अल्पप्रमाणात वसुली हाेते. त्यामुळे पाणी व घरकर थकलेल्या खातेदारकांना नाेटीस बजावण्यात आली हाेती.

पं.सं.निहाय हाेते टेबल : घरपट्टी, पाणी पट्टी थकल्याने ५९ हजार ४२९ जणांना ग्रामपंचायतींमार्फत नोटीस बजावण्यात नाेटीस बजावण्यात आली हाेती. यासाठी संबंधित ग्रामपंचायने केस दाखल केली. त्यानंतर लाेकअदालतीमध्ये थकबाकीदारांसाठी पंचायत समितीनिहाय टेबलची व्यवस्था करण्यात आली. दर्शनीभागावर माहितीचा फलकही हाेता.

बातम्या आणखी आहेत...