आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना रुग्ण संख्या:कोरोनामुळे जिल्ह्यात एकाचा मृत्यू; 3 नवे रुग्ण

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत घटत असली तरी अचानक मोर्शी तालुक्यातील डवरगाव येथील ५५ वर्षीय महिलेचा जिल्हा कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्यामुळे चिंता वाढली आहे. मंगळवार,दि. १६ रोजी १३८ संशयितांच्या चाचण्या केल्यानंतर ३ नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ६ हजार ८५४ झाली असून, सक्रिय रुग्णांची संख्या २८ आहे. मंगळवारी ४ रुग्ण बरे झाले त्यामुळे एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५ हजार १९९ पर्यंत वाढली आहे. सध्या दोन रुग्ण हाॅस्पिटलमध्ये, दोन रुग्ण मनपा क्षेत्रात तसेच २४ रुग्ण ग्रामीण भागात गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...