आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांदूर बाजार-अमरावती मार्गावरील शिराळाजवळ एका दुचाकीने बैलबंडीला मारलेल्या धडकेत दुचाकीस्वार उमेश ज्ञानेश्वर टाले (वय ३३) यांचा जागीच मृत्य झाला आहे. तर जखमी पत्नी व मुलाला उपचारकरिता अमरावतीच्या रिम्स हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे. ही घटना गुरुवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता च्या सुमारास घडली.
नजिकच्या शिरजगाव बंड येथील रहिवासी उमेश ज्ञानेश्वर टाले हे पत्नी व लहान मुलाला घेऊन एका कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी चांदूर बाजार, बोराळामार्गे अमरावतीकडे जात होते. शिराळा जवळ शेतातून निघालेली बैलबंडी अचानक रस्त्यावर आल्याने त्यांची दुचाकी त्या बैलबंडीवर आदळली. दुचाकीची ही धडक एवढी जबर होती की दुचाकीस्वार उमेश टाले यांचा जागीच मृत्य झाला. तर त्यांची पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मते उमेश टाले यांच्या डोक्याला जबर इजा झाली होती. दरम्यान, जखमी पत्नी व मुलगा यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असून ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे वैद्यकीय सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, याचवेळी माजी मंत्री बच्चू कडू या मार्गाने जात होते. हा अपघात दिसताच त्यांनी आपले वाहन थांबवून कार्यकर्त्यांसह मदतकार्य सुरु केले. त्यांनी तत्काळ अपघातातील जखमींना रिम्स हॉस्पिटलला हलवले. तेथे त्यांच्या उपचाराच्या सूचना दिल्या.उमेश हा मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याच्या अचानक मृत्यने चांदूर बाजार मित्र परिवारात शोककळा पसरली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.