आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ वादातून एकाचा खून:गाडीचा धक्का लागल्याने 5 जणांकडून तरुणावर हल्ला, तिघांना पोलिसांकडून अटक

अमरावती7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीने जात असताना 38 वर्षीय अंटू नामक व्यक्तीचा परिसरातच राहणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाच्या दुचाकीला धक्का लागला. याच कारणावरुन त्यांच्यात किरकोळ वाद झाला, मात्र ही खदखद मारेकऱ्यांच्या मनात होती. त्यानंतर चार तासाने गुरूवारी (दि. 4) मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास पाच जणांनी चाकू व रॅफ्टरने हल्ला चढवून अंटू नामक व्यक्तीचा खुन केला. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी शुक्रवारी (दि. 5) तिघांना अटक केली आहे.

अंटू ऊर्फ सचिन किशोर म्हैसकर (38, रा. दरोगा प्लॉट, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी रवि अशोक इंगोले (27, रा. दरोगा प्लॉट), आकाश देविदास विघ्ने (26, रा. सिध्दार्थ मैदान) आणि यश संजय रायबोले (21, रा. यशोदानगर 1) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अंटू ऊर्फ सचिन हा ऑटो चालवत होता. गुरूवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास अंटू हा दुचाकीने घरी जाण्यासाठी गल्लीतून जात असतानाच रवि इंगोले हासुध्दा दुचाकीने येत होता. त्यावेळी दुचाकींचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन अंटू व रवि यांच्यात वाद झाला व किरकोळ मारहाण झाली. त्यानंतर अंटूने त्याच्या पत्नीला फोन करुन सांगितले की, मला रवि इंगोले याने क्षुल्लक कारणावरुन मारहाण केली, त्यामुळे मी टेंशनमध्ये आहे व घरी उशिरा येईल. त्यानंतर रवि इंगोले याने आकाश विघ्ने, यश रायबोले व त्याच्या अन्य दोन मित्रांना फोन करुन बोलवले. दरम्यान रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास रवि इंगोले व त्याच्या मित्रांनी अंटूला दरोगा प्लॉट परिसरात गाठले. त्यावेळी चाकू व लाकडी रॅप्टरने त्याच्या मांडीवर व डोक्यावर प्रहार केले. यामध्ये अंटू रक्तबंबाळ झाला. त्यानंतर मारेकऱ्यांनी अंटूला परिसरातच सोडून पळ काढला होता. रात्री एक वाजताच्या सुमारास अंटूवर हल्ला झाल्याची माहीती त्याच्या कुटूंबियांना मिळाली. कुटूंबीय घटनास्थळी पोहचले असता अंटू रक्ताच्या थारोळ्यात नालीजवळ पडून होता. दवाखान्यात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी मध्यरात्रीच राजापेठ पोलिसांनी रवि इंगोले व त्याच्या साथीदारांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करुन शुक्रवारी सकाळी तिघांना अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...