आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबडनेरा रेल्वेस्टेशन लगत असलेल्या गांधी विद्यालयाच्या बाजूला एक महिला गांजा घेऊन जात असल्याची माहिती क्राइम ब्रँचच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले. यावेळी तिच्याकडून १ लाख ७० हजार रुपये किंमत असलेला साडेआठ किलो गांजा मिळाला आहे. पोलिसांनी गांजा जप्त करुन तिला अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. १३) केली आहे.
रेहानाबी अब्दुल रहेमान (५५, रा. पठाणचौक, अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला शुक्रवारी सकाळी बडनेरा रेल्वे स्थानकाकडून गांधी विद्यालय मार्गे गांजा घेऊन जात असल्याची माहिती शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पीएसआय नरेश मुंडे व त्यांच्या पथकाने गांधी विद्यालया लगतच्या मार्गावर सापळा रचला. यादरम्यान ती महिला आली व पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तीच्याकडे गांजा तसेच प्लास्टिक पन्नी असल्याचे पोलिसांना लक्षात आले. हा गांजा विशाखापट्टणम येथून चिल्लर विक्रीसाठी शहरात आणल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन बडनेरा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी महिलेकडून जप्त केलेला गांजा तसेच या महिलेला बडनेरा पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी या महिलेविरुद्ध एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पीआय अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नरेश मुंडे व त्यांच्या पथकाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.