आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताब्यात:सेमाडोह भागात दोन बिबट्यांच्या मृत्यूप्रकरणी एक जण ताब्यात

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाटातील सिपना वन्यजीव विभागातील सेमाडोहपासून एक किलोमीटर अंतरावर दोन दिवसांपूर्वी दोन बिबट एकाच ठिकाणी मृतावस्थेत आढळून आले होते. या प्रकरणात वनविभागाच्या पथकाने संशयाच्या आधारे सेमाडोह येथील एका व्यक्तीला गुरूवारी (दि. ८) ताब्यात घेतले आहे.

सेमाडोहपासून जंगलात सुमारे एक किलोमीटर अंतरावर एकाच ठिकाणी अंदाजे चार वर्षाचा नर व दीड वर्षाचे मादी बिबट मृतावस्थेत आढळले होते. या दोन्ही मृत बिबटच्या तोंडातून फेस दिसत असल्यामुळे त्यांच्यावर विषप्रयोग, सर्पदंश किंवा अन्य कारणाने झाला का? याबाबत कोणतेही कारण समोर आले नव्हते. मात्र, सर्पदंशने बिबटचा मृत्यू झाल्याचे अलीकडे तरी घडले नसल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले. बिबट मृत आढळल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणापासून काही अंतरावर एक शेळी मृतावस्थेत आढळून आली होती. त्यामुळे या मृत शेळीवर विषप्रयोग झाला आणि ते खाल्ल्यामुळे बिबट मृत झाले आहे का, याबाबतही तपास सुरू आहे, असे सेमाडोह वन्य जीव विभागाचे एसीएफ कमलेश पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...