आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा:एक हजार 43 उमेदवारांनी दिली सात केंद्रांवर ‘एमपीएससी’ परीक्षा

अमरावती7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा श्रेणी-१ गट ब कार्यालयांतर्गत सहायक नगर रचनाकार या पदासाठी रविवारी शहरातील ७ केंद्रांवर परीक्षा पार पडली. यामध्ये १ हजार ४३ उमेदवारांनी परीक्षा दिली, तर १हजार १३६ परीक्षार्थी गैरहजर होते.

निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांच्या मार्गदर्शनात ही परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र शहर नियोजन आणि मूल्यनिर्धारण सेवा श्रेणी-१ गट ब कार्यालयांतर्गत सहायक नगररचनाकार या पदासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे ३१ जानेवारीपूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर ३१ जानेवारी ते २१ फेब्रुवारी या कालावधीत या पदासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज भरले.

राज्यभरात एकूण १३८ पदांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे. ज्यामध्ये अनुसूचित जातीचे १९, अनुसूचित जमातीचे १०, व्हीजेचे ४, एनटी संवर्गातील १०, विमुक्त जमातीचे ३, आर्थिक दुर्बल घटकातील १४, ओबीसी २६ अशा प्रकारे एकूण ८६ पदे आरक्षण संवर्गातून आणि खुल्या संवर्गातील ५२ पदे भरण्यात येणार आहे. ज्यामध्ये जिल्ह्यातून २१७९ उमेदवारांनी अर्ज केले होते.

त्यानुसार रविवारी ७ केंद्रांवर परीक्षा पार पडली. यामध्ये ज्ञानमाता, लाहोटी महाविद्यालय, विद्याभारती, भारतीय महाविद्यालय, न्यू हायस्कूल मेन, मणिबाई गुजराती, रामकृष्ण क्रीडा महाविद्यालय या केंद्रांचा समावेश होता. यामध्ये १ हजार ४३ उमेदवारांनी परीक्षा दिली तर ११३६ उमेदवार गैरहजर होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने केंद्रप्रमुख, उपकेंद्रप्रमुख, लिपिक, हवालदार व इतर पदांवर एकूण १५३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.

बातम्या आणखी आहेत...