आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिच्छन नदीवरील ब्रिटिशकालीन पूल तोडला:नव्या पुलाच्या निर्मितीसाठी एक वर्षाचा अवधी; एक भाग झाल्यानंतर होणार दुसऱ्या भागाचे काम

परतवाडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सर्वाधिक वर्दळीचा बिच्छन नदीवरील ब्रिटिशकालीन पांढरा पूल शिकस्त झाल्याने अखेर शुक्रवारी (दि. १६) पूर्व नियोजनानुसार तोडण्यात आला. तेथे आता नव्याने पुलाची निर्मिती केली जाणार आहे.परतवाडा-बैतुल मध्य प्रदेश सीमेपर्यंत सिमेंट रस्ता व विविध पुलांचे काम जवळपास २७० कोटींपेक्षा अधिक खर्च करून करण्यात आले.

पुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न पूल निर्मितीसाठी नेमलेल्या एजेंसीला नवीन पुलाच्या निर्मितीसाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे. त्यापूर्वीच पुलाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. - पी. एस. वासनकर, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग

बातम्या आणखी आहेत...