आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक निवडणुक:दहा दिवसांत केवळ दोघांनी सोडले मैदान, माघारीची मुदत 20 जूनपर्यंत

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक निवडणुकीच्या मैदानातून गेल्या १० दिवसांत केवळ दोघांनी माघार घेतली. त्यामुळे १२० उमेदवारांचे १९० अर्ज अद्यापही कायम आहेत. दरम्यान, येत्या २० जूनपर्यंत माघार घेण्यास वेळ असल्यामुळे उर्वरित पाच दिवसांत आणखी काही शिक्षकांद्वारे मैदान सोडले जाण्याची शक्यता आहे. अर्थात आगामी २० जूननंतरच निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांची संख्या स्पष्ट होईल. शिक्षक बँकेच्या २१ सदस्यीय संचालक मंडळासाठी येत्या २ जुलैला निवडणूक होत असून, ३ जुलै रोजी मतमोजणीअंती निकाल घोषित केला जाणार आहे. सदर निवडणुकीसाठी गेल्या २७ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरु झाले होते. दरम्यान उमेदवारी मागे घेण्यासाठी ६ ते २० जून हा कालावधी राखून ठेवण्यात आला असून, २१ जूनला निवडणूक रिंगणातील उमेदवारांची अंतिम यादी घोषित होईल. तर त्याच दिवशी दुपारी संबंधितांना चिन्हवाटप ही केले जाईल, असे निवडणूक यंत्रणेच्या वेळापत्रकात नमूद आहे. सहकार क्षेत्रातील अग्रणी बँकांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेची निवडणूक ही सध्या अमरावती शहरच नव्हे तर जिल्हाभरात चर्चेचा मुख्य विषय बनली आहे. कोट्यवधीचे व्यवहार, अमरावतीसह पाच जिल्ह्यात कार्यक्षेत्र आणि जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना सभासदत्व यामुळे ही बँक बऱ्यापैकी नावारूपास आली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हाच नव्हे तर अख्ख्या पश्चिम विदर्भाचे या बँकेच्या निवडणुकीकडे डोळे लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...