आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Amravati
  • Opportunity For Amravatikars To Know The Art And Folk Culture Of Many States Through Lopamudra; Inauguration By Zilla Parishad Chief Executive Officer Avishyant Panda | Amravati Marathi News

दिव्य मराठी विशेष:लोपामुद्राच्या माध्यमातून अमरावतीकरांना अनेक राज्यांची कला लोकसंस्कृती जाणून घेण्याची संधी ;जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्याहस्ते उद्घाटन

अमरावती7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोपामुद्रा सांस्कृतिक महोत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. देशाच्या विविध राज्यातील लोकनृत्य, लोककला यांची अमरावतीकर कलाप्रेमींना मेजवानी मिळणार आहे. सोबतच अमरावतीकरांना अनेक राज्यांची कला संस्कृती जाणून घेण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लोपामुद्राचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा याच्या हस्ते फित कापून झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून पोलिस उपायुक्त शहर विक्रम साळी, पोलिस उपायुक्त ग्रामीण शशिकांत सातव, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, वरिष्ठ अस्थिरोग तज्ञ चंद्रशेखर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडला.

सांस्कृतिक म्हणतांना डोळस संस्कृती दिसायला हवी. तसेच जुन्या पारंपरिकतेच्या पलीकडे सृजनतेचा आदर जपायला पाहिजे. या डोळस आणि पारंपारिक कला जपण्याचा एक सुंदर कलाविष्कार म्हणजे विविध राज्यातील लोककला जपणाऱ्यांनी सादर केलेली कला ही लोक संस्कृतीचे दर्शन घडविते. अशा शब्दात मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. दरम्यान संस्कृती मंत्रालय, भारत सरकार, कॅनव्हास फाउंडेशन, दी शेड ऑफ आर्ट, चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने लोपामुद्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शहरातील सायन्स कोर मैदान येथे ११ मार्च ते २० मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय पारंपरिक नृत्य, सोबतच हस्त शिल्पकला प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. ओडीशी, राजस्थानी, गुजराती, कर्नाटकी, केरळी, यांच्यासह महाराष्ट्रातील विविध लोक, कला संस्कृतीचे दर्शन अमरावतीकरांना घेता येणार आहे. लोपामुद्रा अमरावतीकरांसाठी ही एक मेजवानी ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...