आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर गड राखला अन् सिंहही...:शिवाजी शिक्षण संस्थेत सहा जुन्या पदाधिकाऱ्यांना संधी

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विदर्भभर विखुरलेल्या शिव परिवारातील सदस्यांसह सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेची निवडणूक रविवारी पार पडली. गेल्या पंधरा दिवसांत तयार झालेल्या वातावरणानुसार ही निवडणूक बऱ्यापैकी अटीतटीची होईल, असे वाटत होते. परंतु प्रत्यक्षात हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनलने नऊपैकी आठ जागा जिंकून एकहाती सत्ता कायम राखली. त्यामुळे गड राखला अन् सिंहही.. अशा प्रतिक्रिया सर्वदूर उमटत आहे.

दरम्यान, विजयी झालेल्या नऊपैकी सहा पदाधिकारी हे मावळत्या कार्यकारिणीत असल्याने त्यांची फेरनिवड झाली आहे. पॅनल गठित करताना उमेदवारीवरून एकमत न झाल्यामुळे मावळत्या कार्यकारिणीतील तीन उपाध्यक्षांपैकी एक नरेशचंद्र ठाकरे आणि चारपैकी एक सदस्य असलेल्या केशवराव मेतकर यांनी ‘विकास पॅनल’ची गाठ बांधली होती. परंतु केवळ मेतकर सोडले तर इतर सर्वांना पराभवाचे तोंड पहावे लागले. याउलट जुन्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन गठित झालेल्या प्रगती पॅनलने संस्थेवर आपली मुद्रा उमटविली. त्यामुळे अध्यक्षपदी पुन्हा हर्षवर्धन देशमुख (३८९ मते) विजयी झाले असून दिलीप इंगोले (४२४ मते) कोषाध्यक्षपदावर निवडून आले. याशिवाय उपाध्यक्षपदी अॅड. गजाननराव पुंडकर (३९२ मते), अॅड. जयवंत उपाख्य भय्यासाहेब पाटील-पुसदेकर (३१८ मते) यांना तर सदस्यपदी हेमंत काळमेघ (४९० मते), केशवराव गावंडे (३८७ मते), सुरेश खोटरे (३३१ मते) व सुभाष बनसोड (२८० मते) यांना विजयश्री मिळाली. तीन नव्या चेहऱ्यांना संधी : मावळती कार्यकारिणी आणि आता विजयी झालेले पदाधिकारी यांची तुलना केल्यास यावेळी तीन नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. यामध्ये उपाध्यक्ष अॅड. भय्यासाहेब पाटील पुसदेकर व सदस्य सुरेशदादा खोटरे आणि सुभाष बनसोड यांचा समावेश आहे. हे तिघेही प्रगती पॅनलचे उमेदवार होते.

मेतकरांचेही पद कायम
नरेशचंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वातील विकास पॅनलचे एकमेव उमेदवार केवशवराव मेतकर विजयी झाले. त्यांनी उपाध्यक्षपदासाठी ही निवडणूक लढविली होती. विशेष असे की ते मावळत्या कार्यकारिणीतही याच पदावर कार्यरत होते.

बातम्या आणखी आहेत...