आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडधान्ये:रेल्वे स्थानकावर सेंद्रिय भाजीपाला, कडधान्ये

धामणगाव रेल्वे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील रेल्वे स्थानकांवर ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांवर विशेष स्टॉल्स उघडण्यात येत आहेत. धामणगाव रेल्वे स्थानकावरही प्रवाशांना विषमुक्त अन्न, धान्य, भाजीपाला व फळे मिळावीत आणि सेंद्रिय शेतीचा प्रचार व्हावा, या उद्देशाने रेल्वे प्रशासनाच्या पुढाकाराने रमेश साखरकर यांचा स्टाॅल उभारण्यात आला आहे.

या स्टॉलच्या माध्यमातून साखरकर सेंद्रिय भाजीपाला, तसेच डाळ, चना डाळ, कडधान्य, फळे, हळद व मिरची पावडर आदी पदार्थ प्रवाशांना मिळणार आहेत. दरम्यान, तालुक्यातील भिल्ली येथील मधून प्रवाशांना विविध वस्तू मिळणार आहे. दरम्यान तालुक्यातील भिल्ली येथील रमेश साखरकर हे मागील अनेक वर्षांपासून विषमुक्त शेती करत आहे.

दररोज विविध प्रकारच्या विषमुक्त पालेभाज्यांची चव घेता यावी, यासाठी त्यांनी घरामागे परसबाग तयार केली आहे. त्यांच्याकडे २७२ प्रकारचे संकरित देशी बियाणे आहेत. या बियाण्याच त्यांनी घरीच जणूकाही विद्यापीठच तयार केले आहे. त्यांच्या या बीज बँकेत कडधान्य, वेल वर्गीय, भाजीपाला, मसाला, कंद, फळ, चारा अशा विविध प्रकारच्या देशी जाती आहेत.

रासायनिक औषधांचा आणि खतांचा वापर न करता विषमुक्त शेती करण्याचा आग्रह धरतात. गावोगावी देशी बियाण्याचा प्रचार आणि प्रसार करतात.साखरकर यांनी उभारलेल्या स्टॉलच्या माध्यमातून प्रवाशी व नागरिकांना विषमुक्त भाजीपाला मिळणार असल्याने प्रवासीवर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध
रासायनिक पदार्थाचा वापर करून निरनिराळ्या आजारांना सामोरे जाण्यापासून बचाव होईल यादृष्टीने धामणगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सेंद्रीय भाजीपाला, तुर डाळ, चना डाळ, कडधान्य, फळे, हळद पावडर, मिरची पावडर आदी स्टालवर उपलब्ध करून दिले आहे. -रमेश साखरकर, कृषी तज्ज्ञ, अमरावती

बातम्या आणखी आहेत...