आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय संस्कृतीत सूर्योपासनेला तसेच आरोग्यमय जीवनाला मोठे महत्त्व आहे. सूर्योपासनेच्या माध्यमातून निरोगी, आनंदमय आणि उत्साही जीवन जगता येते. हा दृष्टीकोन ठेवून भारतीय तिथीनुसार माघ महिन्यातील रथसप्तमीला (शुक्ल समाप्ती) आयोजित सूर्यनमस्कार सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांनी आरोग्यदायी सूर्यनमस्काराचे धडे घेतले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील एमए योगशास्त्र, पीजी डिप्लोमा इन योगा थेरपी आणि पीजी डिप्लोमा नॅचरोपॅथी अॅण्ड यौगिक सायन्स या अभ्यासक्रमाच्या संयुक्त विद्यमाने सूर्यनमस्कार सप्ताहाचे आयोजन केले होते. सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव डॉ. तुषार देशमुख उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने भाग घेऊन सूर्यनमस्कार घातले. १२ सूर्यनमस्कार बिजमंत्रासह घातल्यास वर्षभराची ऊर्जा साठवून ठेवण्यास मदत होते. तसेच सूर्यनमस्काराने शरीर लवचिक होऊन हाडे मजबूत बनतात. ज्ञानेंद्रियामध्ये चेतना निर्माण होते. त्यामुळेच योग शास्त्रातही सूर्यनमस्काराचे वेगळे महत्त्व आहे. विभागातील प्रा. प्रफुल्ल गांजरे, प्रा. शिल्पा देव्हारे यांनी प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थी, कर्मचारी, प्राध्यापकांकडून सूर्यनमस्काराचा सराव करून घेतला. सूर्यनमस्कार केल्याने शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक आणि अध्यात्मिक असा सर्वांगीण विकास साधला जातो.
आरोग्यासाठी सूर्यनमस्कार हा बहुगुणी व्यायाम असून शरीर सुदृढ ठेवता येते. एम. ए. योगशास्त्राच्या प्रा. शुभांगी रवाळे, प्रा. स्वप्निल ईखार, प्रा. स्वप्निल मोरे, पी.जी. डिप्लोमा इन योगा थेरपीच्या डॉ. आश्विनी राऊत, प्रा. राहुल दोडके, प्रा. संदीप महल्ले, पी.जी. डिप्लोमा नॅचरोपॅथी आणि यौगिक सायन्सच्या प्रा. अनघा देशमुख, प्रा. आदित्य पुंड तसेच सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार सप्ताहाचा लाभ घेतला. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील व क्रीडा व रंजन विभागाचे संचालक डॉ. अविनाश असणारे यांच्या उपस्थितीत हा सप्ताह संपन्न झाला. कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांना श्रद्धांजली अर्पण करून सप्ताहाचा समारोप करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.