आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्नयन योजना:बँकांकडे पाठवलेल्या 107 प्रस्तावांपैकी 18 झाले मंजूर ; प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील शेतकरी बांधव, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी, गट, सहकारी उत्पादक संस्था यांना कृषी प्रक्रिया उद्योगासाठी अर्थसाह्य करण्याकरिता प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत आतापर्यंत १०७ प्रस्ताव बँकांना पाठवण्यात आले असून, १८ प्रस्तावांचे कर्ज मंजूर झाले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी दिली. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ अंतर्गत संत्रा पिकाला मंजुरी मिळाली होती. तथापि, आता त्याव्यतिरिक्तही नवीन प्रक्रिया उद्योग सुरू करता येणार आहे. तशी तरतूद केंद्र शासनाने केली आहे. यापूर्वीची आठवी उत्तीर्ण ही शिक्षणाची अटही काढून टाकण्यात आली आहे. योजनेचा अधिकाधिक शेतकरी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधीक्षक खर्चान यांनी केले. सध्या कार्यरत असलेल्या, तसेच नवीन उद्योगासाठी वैयक्तिक, स्वयंसहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संस्था याबाबतीत सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना दर्जा वाढ, स्तरवृद्धी, विस्तारीकरण, आधुनिकीकरण, भांडवली गुंतवणूकीसाठी सहाय्य करण्यासाठी या योजनेत सहाय्य केले जाईल. सामायिक पायाभूत सुविधा, तसेच उत्पादनाचे ब्रँडिंग व विपणन यासाठी सहाय्य संत्रा, तसेच त्याव्यतिरिक्त इतर पिकांवर आधारित उद्योगांनाही केले जाईल. प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन बीज भांडवल या योजनेत स्वयं सहाय्यता गटातील प्रत्येक सभासदास चाळीस हजार रूपये याप्रमाणे बीज भांडवल व लहान उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत देण्यात येईल. योजनेत वैयक्तिक लाभार्थी, स्वयं सहाय्यता गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी उत्पादक संस्था यांनी http://pmfme.mofpi.gov.in या ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज सादर करावेत, असे आवाहन आहे.

बातम्या आणखी आहेत...