आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजजोडणी:जिल्ह्यातील 1630 पैकी केवळ 26 मंडळांनी घेतली अधिकृत वीजजोडणी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. दोन वर्षानंतर पुन्हा एकदा सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेण्याबाबत महावितरणने आवाहन केले होते. शहर व जिल्ह्यात सुमारे १६३० सार्वजनिक गणेश मंडळात श्रीगणेश मूर्तींची स्थापना झाली असताना शुक्रवारपर्यंत (दि. २) केवळ २६ मंडळांनीच अधिकृत वीजजोडणी घेतली आहे.

या काळात बहुतांश मंडळात आजूबाजूच्या घरातून किंवा दुकानांतून वीज घेतली जाते. त्यामुळे विजेची चोरी होत नसली तरी मात्र अपघाताचे धोके वाढू शकतात, असे महावितरणच्या सूत्रांचे म्हणणे आहे.शहरात सुमारे ४४४ व ग्रामीण भागात ११८६ सार्वजनिक गणेश मंडळात श्री गणेशाची स्थापना झाली.

अधिकृत वीजजोडणी न घेण्याचे धोके
ज्याठिकाणी अधिकृत वीजजोडणी घेतली नाही, ते आजूबाजूंकडून वीज घेतात. यावेळी वायरिंग योग्य पद्धतीने होते किंवा नाही, याबाबत शाश्वती राहत नाही. केबलचे जॉइंट व्यवस्थित न झाल्यास किंवा वायरचा टिन पत्र्यांना स्पर्श झाल्यास विजेचा झटका लागू शकताे. वास्तविकता सार्वजनिक मंडळांना घरगुती वीज दराप्रमाणेच दर आकारले जाणार आहे.

तपासणीसाठी पथकांची निर्मिती
सार्वजनिक गणेश मंडळांकडून मागणी केल्यास आम्ही तत्काळ वीजजोडणी देतो. बहुतांश सार्वजनिक मंडळे आजूबाजूच्या ठिकाणांहून वीज घेतात. यामध्ये अपघात होण्याचा धोका राहतो. त्यामुळे अधिकृत जोडणी घेणे आवश्यक आहे. तपासणी करण्यासाठी आम्ही दामिनी पथकांची निर्मिती केली आहे. आनंद काटकर, कार्यकारी अभियंता (शहर).महावितरण.

अजूनही वीजजोडणी देणे सुरू
जिल्ह्यात २६ सार्वजनिक मंडळांनी वीज जोडणीची मागणी केली होती. त्यांना वीज दिली आहे. ग्रामीण धील ३ तर अमरावती शहरातील २३ जोडण्यांचा समावेश आहे. मंडळांनी मागणी केल्यास वीज जोडणी देता येईल. १० ते १५ मेगावॅटची वाढ झाली आहे. दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण.

बातम्या आणखी आहेत...