आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आरटीई’ प्रवेशासाठी प्रतीक्षा‎ संपली; आज काढणार ड्रॉ‎:9 हजार 341 मधून 2 हजार 305 पाल्यांची लागणार लॉटरी‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरटीईच्या ऑनलाइन प्रवेश अर्जानंतर‎ प्रतीक्षेत असलेल्या पालकांची पाल्यांच्या‎ प्रवेशाची प्रतीक्षा संपली असून, बुधवारी पात्र‎ असलेल्या ९ हजार ३४१ अर्जामधून लॉटरी‎ काढली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील २‎ हजार ३०५ मध्ये कुणाचा क्रमांक लागतो‎ याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पुणे‎ येथे ऑनलाइन ड्रॉ काढल्या जाणार असून,‎ त्यानंतर लगेच पालकांना प्रवेशाचे संदेश‎ मोबाइलद्वारे दिले जाणार आहे.‎ दिला जातो. बुधवारी पुणे येथे ऑनलाइन‎ लॉटरी काढण्यात येणार आहे. यामध्ये २‎ हजार ३०५ पाल्यांची पहिली व तितकीच‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे.‎ पहिल्या यादीत प्रवेश न करणाऱ्या पाल्यांचे‎ नाव बाद करून प्रतीक्षा यादीतील पाल्यांना‎ प्राधान्य दिले जाणार आहे. लॉटरी नंतर लगेच‎ पालकांना मोबाइलद्वारे संदेश दिला जाणार‎ आहे. याशिवाय पालकांना त्यांच्या लॉगिंग‎ मध्येही लॉटरीचे अपडेट दिसणार आहे.‎