आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इलेक्ट्रिकल कंपनी:महावितरणचे जिल्ह्यातील‎ दीड हजारांवर अधिकारी,‎ कर्मचारी संपावर जाणार‎

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका खासगी इलेक्ट्रिकल कंपनीने भांडूप परिमंडळांत‎ वीज वितरण करण्याचा समांतर परवाना महाराष्ट्र‎ विद्युत नियामक आयोगाकडे मागितला आहे.‎ त्यामुळेच सरकार व प्रशासनाच्या खासगीकरण‎ धोरणाविरोधात महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी,‎ अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने आंदोलनाचा‎ निर्णय घेतला आहे. त्यामुळे महावितरण, निर्मिती व‎ पारेषण या तिन्ही कंपन्यांतील प्रत्येक कर्मचाऱ्यांपासून‎ ते उपकार्यकारी अभियंता पदापर्यंतचे सर्व‎ अधिकाऱ्यांनी बुधवार (दि. ४) पासून ७२ तास‎ संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

या संपामुळे‎ महावितरणचे जिल्ह्यातील सुमारे दीड हजार कर्मचारी,‎ अधिकारी संपावर जाणार आहेत.‎ जिल्हाभरातील सुमारे दीड हजार अधिकारी‎ कर्मचाऱ्यांनी आज मध्यरात्री बारा वाजता पासून ७२‎ तासाचा संप पुकारला आहे. त्यामुळे आगामी तीन‎ दिवस जिल्ह्यातील वीजपुरवठा विस्कळीत झाल्यास‎ वीजग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागू‎ शकतो. यावेळी पर्यायी व्यवस्था म्हणून काही कंत्राटी‎ कर्मचाऱ्यांना महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी‎ कामावर बोलवले आहे. यावेळी शहरातील १४‎ उपकेन्द्रासोबत जिल्हाभरात असलेल्या ११७‎ उपकेन्द्रावर कंत्राटी, परिविक्षाधिन कनिष्ठ अभियंता,‎ प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ, प्रशिक्षणार्थी यंत्रचालक यांनाही‎ बोलावण्यात आले आहे. त्यामुळे नियमीत विज पुरवठा‎ सुरू राहणार आहे. तसेच शहरात एक व चार‎ विभागाच्या ठिकाणी एक असे एकूण पाच नियंत्रण‎ कक्ष जिल्ह्यात सुरू केले आहे. नागरिकांना सुरळीत‎ सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अधीक्षक‎ अभियंता दिलीप खानंदे यांनी सांगितले

बातम्या आणखी आहेत...