आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गो-ग्रीन:जिल्ह्यात 5 हजारांवर पर्यावरणस्नेही ग्राहक ; ‘गो-ग्रीन’ सेवेअंतर्गत मिळेल प्रत्येक बिलात 10 रुपयांची सूट

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

परिमंडळातील ९ हजार २३७ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी छापील वीज बिल नाकारत कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. वीज बिलासाठी ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीज बिलामागे १० रुपयांची सूट दिली जात आहे. महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेतून बिलासाठी कागदाचा वापर बंद करण्यात आला. तरी वीज बिलाची दरमहा प्रत संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवण्याची सोय आहे. सद्यस्थितीत अमरावती जिल्ह्यात ५ हजार ३४१ वीज ग्राहकांनी महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये सहभाग घेतला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजना सुरू करण्यात आली. यामध्ये वीज बिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रति बिलात दहा रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे वीज बिलामध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. वीज बिल तयार झाल्यानंतर लगेचच ई-मेल तसेच एसएमएसद्वारे दरमहा वीज बिल प्राप्त होणार असल्याने ग्राहकांना प्रॉम्प्ट पेमेंट्सह ते तत्काळ ऑनलाइन भरण्याची सोय उपलब्ध होते.

संगणकात सॉफ्ट कॉपी जतन करण्याची सोय वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीज बिल संगणकात सॉफ्ट कॉपीत जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेत स्थळावर चालू वीज बिल यासह मागील ११ महिन्यांचे असे एकूण १२ महिन्यांची वीज बिलं मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. महावितरण ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावरील जी जी एन या अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाइल ॲपद्वारे किंवा संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंक वर करावी.

बातम्या आणखी आहेत...