आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाराशर ब्राह्मण हितसंवर्धक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय उपवर-वधू तसेच घटस्फोटित, विधवा-विधूर परिचय मेळावा नागपूरस्थित खामला परिसरातील सांस्कृतिक सभागृह येथे पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध निवेदिका रेणुका देशकर, प्रमुख पाहुणे म्हणून स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, मार्गदर्शक म्हणून भाजयुमोच्या प्रदेश महामंत्री शिवानी दाणी-वखरे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीपरशुराम व महर्षि व्यास यांचे पूजन, दीप प्रज्वलनाने करण्यात आली. डॉ. शेंबेकर यांनी उपस्थित उपवर-वधूंना संबोधित करताना त्यांना भावी आयुष्यात आरोग्याविषयी माहिती दिली. शिवाणी दाणी-वखरे यांनी उपस्थित पालक, पाल्यांना यथोचित मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, संसार सुखाचा करायचा असेल तर आधी आपापल्या जबाबदारी ओळखून आणि वेळ पडल्यास कधी दोन पावले मागे येण्याची तयारी ठेवली, तर संसारात वाद विवादाची स्थिती निर्माण होणार नाही.
रेणुका देशकर यांनी अध्यक्षीय भाषणातून परिचय मेळाव्याचे महत्त्व विषद करीत उपवर-वधूंना मार्गदर्शन केले. यावेळी उपवर-वधूंच्या परिचय पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर उपवर-वधूंनी सर्वांना आपापला परिचय करून दिला. मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यभरातून ६०० ते ७०० समाज बांधवांची उपस्थिती होती. प्रास्ताविक अभिषेक पाठक, संचालन पूजा अवधूत, सुजाता जोशी यांनी, तर आभार दत्तात्रय शेगावकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रहिसे, श्रीकांत तिवरखेडे, गजानन माहुलकर, अभिषेक पाठक, दत्तात्रय शेगावकर, शाम लांबे, प्रफुल्ल ताम्हणे, प्रविण गोधे, विनोद रयसे, पल्लवी नानोटी, संगीता हेडाऊ, रोहिणी मोहरील, राहुल ठेंगडी, पूजा अवधूत तसेच वधूवर परिचय समितीचे अध्यक्ष दिवाकर लांबे, कविता पांडे आदींसह सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.