आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अल्पवयीन दुचाकीचालकांसह पालकांनाही समज‎

अमरावती‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतवाडा पोलिसांनी सध्या अल्पवयीन‎ दुचाकीचालक व त्यांच्या पालकांना समज‎ देण्याबाबत मोहीम हातात घेतली आहे. पोलिसांनी‎ अवघ्या दोन दिवसात परतवाडा शहरात तब्बल‎ १५३ अल्पवयीन दुचाकीचालकांना पकडले.‎ महत्वाची बाब म्हणजे पोलिसांकडून दुचाकी‎ चालवणाऱ्या अल्पवयीनांवर किंवा त्याच्या‎ पालकावर थेट कारवाई न करता त्यांना समज‎ देण्यात येत आहेत.

या मोहिमेमुळे निश्चितच‎ अल्पवयीन दुचाकी चालकांच्या संख्येत घट‎ येईल व भविष्यातील धोके टाळता येणार‎ असल्याचा विश्वास परतवाडा पोलिसांनी व्यक्त‎ केला.‎ अलीकडे शहर तसेच ग्रामीण भागात आठवी,‎ नववीतील मुल, मुली रस्त्यावर वाहन घेऊन‎ भरधाव चालवताना दिसतात. शाळा,‎ महाविद्यालय, शिकवणी आदींसाठी पालकही‎ त्यांच्या हातात वाहन देतात.

वास्तविकता वयाची‎ अठरा वर्षे पूर्ण केल्याशिवाय वाहन चालवण्याचा‎ परवाना मिळत नाही, त्यामुळे अल्पवयीनांनी‎ वाहने चालवणे नियमांविरुद्ध आहे. मात्र तरीही‎ सर्रास अल्पवयीनाच्या हातात दुचाकी आलेल्या‎ आहेत. पालकांनी अल्पवयीनांच्या हातात दुचाकी‎ दिल्या नाहीत तर त्यांच्या हातात वाहने येणारच‎ नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र‎ अल्पवयीनांपैकी अनेकांना वाहतूक नियमांची‎ जाण नाही, त्याचे दुष्परिणाम होताना दिसत आहे.‎ त्यामुळे तूर्तास पोलिसांकडून त्यांना पकडून‎ पालकांना ठाण्यात बोलावून समज देण्यात येत‎ आहे. मात्र यापुढे वाहन चालवताना आढळल्यास‎ कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांकडून‎ अल्पवयीनांना बजावून सांगण्यात येत आहे.‎

शहरातील मार्गांवर अल्पवयीन दुचाकीस्वार सर्रास वाहन‎ चालवतात. अनेकदा शहराला लागून असलेल्या‎ निर्जनस्थळी, पर्यटनस्थळी शाळा, महाविद्यालयाच्या वेळेत‎ तरुण, तरुणींचे जत्थे दिसतात. त्यामध्ये बहुतांश अल्पवयीन‎ मुल- मुली असतात. घरातून शाळा, महाविद्यालय,‎ शिकवणीच्या नावावर बाहेर पडलेले हे अल्पवयीन‎ पालकांच्या मागे कुठेतरी दुचाकीने फिरत असतात. यातून‎ भविष्यात काही घटना घडू शकतात. तसेच वाहन परवाना‎ नसल्यामुळे त्यांना वाहतूक नियमांची पुरेशी जाण राहत‎ नाही, त्यामुळे अपघातही होऊ शकतो, ते टाळण्यासाठी ही‎ मोहीम आम्ही हातात घेतली आहे. आम्ही १ ते २८‎ फेब्रुवारीपर्यंत अल्पवयीन दुचाकीस्वारांना पकडून त्यांना व‎ त्यांच्या पालकांना समज देणार आहोत, त्यानंतर मात्र‎ कारवाई करण्यात येणार असल्याचे परतवाड्याचे ठाणेदार‎ संदीप चव्हाण यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...