आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:पार्वतीनगर येथे रक्तदान शिबिरात सहभागींचा सत्कार

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्वतीनगर नं. २ मधील नीलय माहोरे याच्या वाढदिवसानिमित्त मंगलमूर्ती आरोग्य व बहुउद्देशीय सेवा समिती, संकटमोचन मंदिर ट्रस्ट, डॉ. गोविंद कासट मित्र मंडळ, पोलिस मित्र परिवाराच्या संयुक्त सहकार्याने नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.

या प्रसंगी उद््घाटक म्हणून डॉ. गोविंद कासट होते. डॉ. अनिल कविमंडन यांच्या अध्यक्षतेखाली सुनंदा खरड, जनार्दन माहोरे, कृष्णराव साखरे, जगदीश सायसिकमल यांची प्रमुख उपस्थिती होती. विशाल झिंगरे, नरेश गुहे, गजानन चोपडे, राजेश चंदन, नरेंद्र कुमावत, अशोक कुमावत, निलय माहोरे, सागर माहोरे, नरेश बोकडे, आशिष काळे, संजय ग्रेसपुंजे, तेजस सेवलकर, अजय देशमुख आदींनी रक्तदान केले. सूत्रसंचालन सागर माहोरे यांनी केले, तर आभार विद्या माहोरे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...