आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंघटन मजबूत करण्यासोबतच देशात आगामी काळात सत्ता प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसने नवा संकल्प घोषित केला आहे. त्यासाठी शिर्डी येथे कार्यशाळा घेतली जात असून त्यामध्ये स्थानिक पुढारी सहभागी झाले आहेत. यानंतर तशीच कार्यशाळा ११ जूनपासून येथेही घेतली जाईल, असे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे म्हणणे आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आमदार बळवंत वानखडे, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्या पवार, माजी शहराध्यक्ष किशोर बोरकर, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष अंजली ठाकरे, मुजफ्फर हुसेन आदी सहभागी झाले आहेत.
केंद्रातील मोदी सरकारने गेल्या ८ वर्षापासून सुरु केलेल्या कारभाराची पोलखोल काँग्रेस पक्ष करणार आहे. भाजपा सरकारच्या काळात वाढलेली महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नावर भाजपचे अपयश आदी प्रश्न जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे. याशिवाय काँग्रेसच्या विचारधारेला माननारे निष्ठावान कार्यकर्ते पुन्हा उभे झाले झाले पाहिजेत. या उद्देशाने शिर्डीत नव संकल्प शिबीर सुरु झाले. त्याच धर्तीवर अमरावतीत ११ ते १४ जून या काळात जिल्हास्तरीय शिबीर घेतले जाईल. यावेळी महाराष्ट्राचे पक्ष प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर मार्गदर्शन करतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.