आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे रद्द:मुंबई मार्गावरील रेल्वे रद्द झाल्याने प्रवासी त्रस्त

अमरावती9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई मार्गावर कर्नाक रेल्वे उड्डाण पुलासाठी रेल्वेने २७ तासांचा विशेष वाहतूक व पाॅवर ब्लाॅक घेतल्याने १९ ते २१ या तीन दिवसांच्या कालावधीत अमरावती-मुंबई अंबा एक्सप्रेस, महाराष्ट्र, हावडा, सेवाग्राम अशा महत्त्वाच्या ९० टक्के रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना जबर फटका बसला असून ते सततच्या रेल्वेच्या ब्लाॅकमुळे त्रस्त झाले आहेत.

त्यामुळे भुसावळपर्यंत जाणाऱ्या ज्या काही मोजक्या गाड्या जसे सुरत पॅसेंजर, भुसावळ-वर्धा, वर्धा-भुसावळ या गाड्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळणार नाही, एवढी गर्दी आहे. हा ब्लाॅक १९ नोव्हेंबरला रात्री ११ वाजतापासून सुरू झाला तो २१ नोव्हेंबरला पहाटे. ५ वाजेपर्यंत होता. त्यामुळे मुंबई मार्गावरील बहुतेक गाड्या निघाल्याच नाहीत. परिणामी पॅसेंजर गाड्यांमध्ये चांगलीच गर्दी वाढली आहे. अनेकांचे आरक्षण रद्द झाल्यामुळे त्यांना पर्यायी वाहने, ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...